राहू येथील वाळू व्यावसायिक यांच्यावर झालेल्या गोळीबारात संतोष जगताप यांच्यासह दोन जण ठार – उरळीकांचन येथील घटना

Rokhthok Maharashtra 1 0

उरुळी कांचन :

उरुळी कांचन( तालुका हवेली) येथील हॉटेल सोनाई समोर राहू (ता दौंड) येथील वाळू व्यवसायिक संतोष संपतराव जगताप यांच्यावर चार ते पाच जणांनी आज शुक्रवारी( ता. 22) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला. यात संतोष जगताप यांचा मृत्यू झाला तर संतोष जगताप यांना जखमी अवस्थेत प्रत्युत्तरात दाखल केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर ठार झाल्याचे पुढे आले आहे. तर तीन ते चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत तसेच संतोष जगताप यांचा अंगरक्षक जखमी झाला असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
संतोष जगताप दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापुर मार्गावरील हॉटेल सोनाई समोर चर्चा करीत असताना रस्त्याच्या बाजूने आलेल्या चार ते पाच जणांनी संतोष जगताप व त्यांच्या अंगरक्षक आवर घातक हत्याराने हल्ला चढविला तसेच गोळीबारही केला यात संतोष जगताप व त्यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले तर जखमी अवस्थेत संतोष जगताप यांनी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देताना गोळीबार केला त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर उर्वरित पळून जाण्यात यशस्वी ठरले.
जखमी संतोष जगताप यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता संतोष जगताप यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तसेच शेजारील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यादेखील घटनास्थळी गेले आहेत टोळीयुद्धातून फायरिंग झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे नेमका गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र वाळूची ठेकेदारी आणि इतर काही कारणामुळे तसेच पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचे सूत्रांनी सांगितला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.