पिसोळीत ट्रॅक्टरखाली चिरडून 8 वर्षीय मुलीचा मृत्यू!

Rokhthok Maharashtra 6 0

पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पिसोळी परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
वर्षा अजय जगदेव, वय 8 वर्षे, असे मृत मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास वर्षा पिसोळीतील होले वस्ती परिसरातून जात होती. त्यावेळी भरधाव ट्रॅक्टरने तिला धडक दिली. या अपघातात ती ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक गणेश शंकर दिवटे घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांच्या चौकशीत चालकाकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले.
या प्रकरणी वर्षाचे वडील अजय संजय जगदेव, वय 27 वर्षे, यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक गणेश शंकर दिवटे आणि वाहनमालक भाऊसाहेब बाजीराव मासाळ, वय 47 वर्षे, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रासकर करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.