ड्युटीवर असताना त्रास झाला, घरी येताच काळाचा घाला! पोलीस कर्मचारी दत्तात्रय तेलंगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Rokhthok Maharashtra 9 0

पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू पोलीस कर्मचारी दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
दत्तात्रय तेलंगे हे ड्युटीवर असताना त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ते घरी आले. मात्र घरी आल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
हडपसर येथील अमरधाममध्ये शासकीय इतमामात दत्तात्रय तेलंगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस खात्यातील उपायुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
हडपसर, वानवडी, काळेपडळ आणि पुणे शहरातील विविध ठिकाणी सेवा बजावताना दत्तात्रय तेलंगे यांनी मोठा मित्रपरिवार जपला होता. हसतमुख, मनमिळावू आणि माणुसकी जपणारा पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती.
दरम्यान, ऑन ड्युटी असताना त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबातील मुलाला अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थित मान्यवरांनी केली.
दत्तात्रय तेलंगे यांना रोखठोक महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.