ऑस्ट्रेलियात शिक्षणाच्या नावाखाली 24.45 लाखांची फसवणूक? यवतमध्ये रमेश मांडोत व मुलावर गुन्हा

Rokhthok Maharashtra 5 0

पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 755/2026 अंतर्गत फसवणूक आणि विश्वासघाताचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात फिर्यादी युसुफ अब्दुलरेहमान पठाण यांनी आरोप केला आहे की, त्यांचे जुने मित्र रमेश कुंतीलाल मांडोत आणि त्यांचा मुलगा कल्पेश रमेश मांडोत यांनी मुलाला ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी पाठवण्याच्या कारणावरून विश्वास संपादन केला.

https://youtube.com/shorts/XZHMCNPTkGA

फिर्यादीनुसार, आरोपींनी शेतजमिनीवर 24 लाख 45 हजार रुपयांचे शैक्षणिक कर्ज काढण्यास सांगितले आणि कर्जाचे हप्ते व व्याज वेळेवर भरण्याचे आश्वासन दिले. मात्र, कर्जाची रक्कम घेतल्यानंतर हप्ते भरले नाहीत. त्यामुळे बँकेकडून नोटिसा येऊ लागल्या.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, शेती जप्त होण्याची वेळ आल्याने त्यांना स्वतःची शेती कमी दरात विकून सुमारे 26 लाख 28 हजार रुपये भरून कर्ज फेडावे लागले. त्यानंतरही आरोपींकडून पैसे परत मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी रमेश कुंतीलाल मांडोत आणि कल्पेश रमेश मांडोत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 406, 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास यवत पोलीस करत आहेत

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.