खून अलिबागमध्ये, बॉडी आंबेनळी घाटात! नातवाने आजीचा केला निर्घृण खून

Rokhthok Maharashtra 14 0

सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाट पुन्हा एकदा एका धक्कादायक गुन्ह्यामुळे चर्चेत आला आहे. अलिबागमधील एका युवकाने स्वतःच्या सख्ख्या आजीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या तपासात आरोपीने खुनाची कबुली दिली असून, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने आजीचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकल्याचे सांगितले. आरोपीने पोलिसांना मृतदेह टाकलेले ठिकाणही दाखवून दिले.
यानंतर अलिबाग पोलीस, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या मदतीने धोकादायक दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
काही दिवसांपूर्वी याच घाटात भीषण अपघातात आठ युवकांचा मृत्यू झाला होता. आता या हत्याकांडामुळे आंबेनळी घाट पुन्हा एकदा चर्चेत आला असून सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.