छत्रपती शाहूमहाराज रयतेचे राजे होते : प्राचार्य दत्तात्रय जाधव.

Rokhthok Maharashtra 47 0

हडपसर,वार्ताहर. राजे अनेक होऊन गेले. परंतु छत्रपती शिवाजीमहाराज यांचा आदर्श घेऊन रयतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे,रयतेच्या मनातील राजे खूप कमी होऊन गेले.आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करून शाहूमहाराज यांनी लोककल्याणकारी कारभार केला.
राजर्षी छत्रपती शाहूमहाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते असे प्रतिपादन प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टींपासून दूर रहावे असे आवाहन त्यांनी केले.

 

सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले.चित्रा हेंद्रे यांनी शाहूमहाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. त्यानंतर वेदांत ढोले,ओकांर वलवले, श्रीराज नावडे,या विद्यार्थ्यांनी शाहूमहाराज
यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. रश्मी गुजर यांनी शिक्षक मनोगतात शाहूमहाराज यांच्या समग्र जीवनाची माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,आजीव सेवक अनिल मेमाणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सविता पाषाणकर, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,धनाजी सावंत,गजेंद्र शिंदे, सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा कांबळे केले.सूत्रसंचालन स्मिता क्षीरसागर
यांनी केले.तर आभार स्मिता पाटील यांनी मानले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.