धोंडे जेवण ठरलं अखेरचं! सासुरवाडीत मारहाण, अपमानानंतर जावयाने संपवलं आयुष्य

Rokhthok Maharashtra 19 0

“धोंडे जेवणासाठी सासुरवाडीत गेलेल्या जावयाचं ते अखेरचं जेवण ठरलं… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
संतोष गोविंद चंडोल, वय 28 वर्षे, हे पत्नीसोबत अधिक मासानिमित्त धोंडे जेवणासाठी सासरी गेले होते. मात्र सासरच्या घरी पोहोचल्यानंतर पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.
आरोपानुसार, पत्नी, मेव्हणा, सासू आणि चुलत सासरे यांनी संतोष यांना बेदम मारहाण केली. सर्वांसमोर झालेल्या या अपमानामुळे संतोष मानसिकदृष्ट्या खचले.
या घटनेचा धक्का सहन न झाल्याने त्यांनी विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताच्या भावाने भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पत्नी, मेव्हणा, सासू आणि चुलत सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे केळगाव आणि सुरंगळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.”

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.