पुण्यात गुन्हेगारीच्या सलग घटना; बिल मागितल्याच्या वादातून हल्ला, पिस्तूलसह दोघे अटकेत, तडीपार गुंडही जेरबंद!

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातील लष्कर भागात एका उपाहारगृह चालकाने जुने बिल मागितल्याच्या कारणावरून आरोपीने त्याच्यावर आणि त्याच्या भावावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केला. या घटनेत दोघेही जखमी झाले असून पोलिसांनी हाशम आतउल्ला शेख याला अटक केली आहे. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
हडपसरमधील महंमदवाडी परिसरात काळेपडळ पोलिसांनी कारवाई करत दोन तरुणांना देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूसांसह अटक केली. चौकशीत दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्र बाळगल्याची कबुली आरोपींनी दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
गंभीर गुन्ह्यांमुळे दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला प्रथमेश विटकर हा पुण्यात पुन्हा फिरताना आढळला. चतु:शृंगी पोलिसांनी त्याला कोयत्यासह अटक केली असून तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम सुरू असून सलग कारवायांमुळे अनेक आरोपी गजाआड झाले आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.