प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; PSI सह दोघांना अटक

Rokhthok Maharashtra 2 0

पुणे पोलिस दलाला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल ७ लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर झाला आहे.
या प्रकरणात पीएसआय अजित बडे आणि पोलिस कर्मचारी सुदाम तायडे यांना गुन्हे शाखेने अटक केली असून महिला पोलिस कर्मचारी सोनाली हिंगे अद्याप फरार आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, एका अल्पवयीन मुलीला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने या संपूर्ण कटाची सुरुवात झाली.
मुलीचा वापर करून प्राचार्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे.
प्रकरण उघड होताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तिघांवर बडतर्फीची कारवाई केली.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.