Uncategorized

जगाने स्वीकारलेल्या निसर्गोपचार आयुर्वेदाचा केंद्रबिंदू भारत ; केंद्रीय आयुष राज्यमंत्री “श्रीपद नाईक” यांचे प्रतिपादन

भारतातील पाहिले निसर्गोपचार केंद्र, 200 कोटी खर्च
कोंढवा/ पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
आयुर्वेद, योगा व निसर्गोपचार संपूर्ण जगाने स्वीकारले असून याची निर्मिती केंद्र भारत आहे भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात प्रत्येक जिल्ह्यात निसर्गोपचार केंद्र स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालय राज्यमंत्री श्रीपद नाईक यांनी दिली.
आयुष मंत्रालय भारत सरकारच्या राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थांच्या 200 कोटी रूपये खर्चाच्या निसर्गग्राम प्रोजेक्टचा भूमिपूजन समारंभ येवलेवाडी कोंढवा येथे करण्यात आला.
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपद नाईक बोलत होते.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार योगेश टिळेकर, डॉ.सत्यलक्ष्मी, डॉ.ईश्वर बसोरेड्डी, महेश कापरे, नगरसेवक विरसेन जगताप, वृषाली कामठे, संगीता ठोसर, स्नेहल दगडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भारत सरकारचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून भारतातील पहिलाच प्रकल्प पुण्यामध्ये येवले वाडी येथे सुरू करण्यात आला आहे या प्रकल्पासाठी जागेची अडचण येत होती प्रशासन व मंत्र्यांकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प पुण्यातून बाहेर जाऊ नये म्हणून प्रयत्न केले अशी माहिती हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिली
निसर्गाला साथ दिली पाहिजे कृत्रिमपणा लाथ दिली पाहिजे हा संदेश डोळ्यासमोर ठेवून शेवटी निसर्गोपचार केंद्रात जाण्यापेक्षा आपल्या स्वास्थ्यासाठी निसर्गोपचार केंद्रातून सुरुवात करावी असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले
मुंबई एक्सप्रेस वे किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी रिंग रोड येवलेवाडी येथे होत असून या भागाचा सर्वांगीण विकास भविष्यात होणार असल्याने हा भाग विकासाचा केंद्रबिंदू म्हणून पुढे येईल असे मत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले
कार्यक्रम प्रसंगी डॉ.अनिल गुजर, रतन माळी, डॉ.कुमार कोद्रे, डॉ.बाळासाहेब हरपळे यांच्यासह अनेक डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
तसेच आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी भूषण तुपे, नितीन होले, चेतन टिळेकर, योगगुरू अनंत झांबरे, उल्हास शेवाळे आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ.के सत्यलक्ष्मी आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाल्या कि, आयुष मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट होत आहे. या निसर्गग्राम वैद्यकीय उपचारात वेगवेगळ्या आजारांवर उपचार होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने फिजीयोथेरेपी, नैसर्गिक उपचार, योग चिकित्सा, आणि अन्य प्रकारच्या नैसर्गिक पद्धतीने आजारांवर उपचार केले जाणार आहेत. या प्रोजेक्ट मध्ये अंडर ग्रेजुएट, ग्रैजुएट, पोस्टग्रेजुएट, पीएचडी, गांधियन स्टडीज अशा काही विषयांवर शिकवले जाणार आहे. यावेळी त्यांनी आयुष आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने या हॉस्पिटलचा आता शुभारंभ सुरु झाला आहे. हे उपचार केंद्र २५एकरमध्ये होणार असून या करीता २०० कोटी खर्च येणार असून हे २ वर्षात तयार होणार आहे. भविष्यात राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान ताडीवाला रोड पुणे येथे आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली हे उपचार केंद्र होणार आहे. येथे विविध आजारांवर उपचार केले जातात. आता त्यांना या उपचार केंद्रा मध्ये दाखल करून घेऊन उपचार देखील केले जातील. हे निसर्गग्राम उपचार केंद्र येथे झाल्यामुळे महाराष्ट्र तसेच देशाच्या कान्या कोपऱ्यातून आलेल्या नागीरकांवर अत्यल्प दारात नैर्सगिक उपचार केले जातील. विविध आजारांवर येथे उपचार केले जातील तसेच आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, फिजीयोथेरेपी तसेच इतर विभाग येथे कार्यरत असतील. महाराष्ट्र शासनाने २५ एकर जमीन दिल्यामुळे त्यांचे योगदान महत्वाचे आहे असेही ते यावेळी म्हणाले. या निसर्ग ग्राम  मध्ये मेडिकल कॉलेज ज्यामध्ये  ग्रेजुएशन, पोस्ट ग्रेजुएशन, पीएचडी, फ़ेलोशिप आणि  पैरा-मेडिकल कोर्सेस सुरु केले जातील. यामध्ये महात्मा गांधी यांचे जिवंत स्मारक निर्माण केले जाणार आहे. हा प्रोजेक्ट गुरुकुल पद्धतीच्या शिक्षण पद्धतीवर असणार आहे त्यामुळे रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करून नैर्सगिक पद्धतीच्या उपचार तसेच योगोपचार केले जाऊन त्या पद्धतीचे शिक्षण येथील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. येथे रुग्णांना दाखल करून घेण्याची सुविधा असल्यामुळे या हॉस्पिटलला खूप फायदा होणार आहे. यामुळे नैर्सगिक पद्धतीने होणारे उपचार आणि योगोपचार घरोघरी पोहोचविले जाणार आहेत. १८ नोव्हेंबर २०१८ ला पहिला नैर्सगिक उपचार दिवस आपण साजरा केला.

Comment here