Uncategorizedशिरुर

अजित पवारांना घाबरत नाही….. अमोल कोल्हेच्या घराशेजारी विकासकामे केली राष्ट्रवादीच्या विरोधकांनी पोकळ गप्पा मारू नये.. खा.आढळराव पाटील यांचे आरोपांना प्रत्युत्तर

 

हडपसर : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
हडपसर व कोंढवा येथे जाहीर सभा झाल्यानंतर शिवाजी आढळराव पाटील  यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. कोल्हेवर निशाणा साधला. पंधरा वर्ष राष्ट्रवादीच्या घराशेजारील कामे करून हि विरोधक काही कामे केली नसल्याचे नुसतेच पोकळ ओरडताना दिसत आहे. विरोधाकडे माझ्याविरोधात पोकळ टीकेशिवाय काहीच नाही. अजित पवार कितीही ताकद लावा निवडून येणारच असे सांगत शिवसेना, भाजप, आरपीआय युतीचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोधकांच्या टिकेकर प्रत्युत्तर दिले.

भाजप व शिवसेना आरपीआय शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार महादेव बाबर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल हरपळे, अक्षय आढळराव पाटील, नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, तानाजी लोणकर आदी उपस्थित होते.
शिरूर मतदार संघ हा सर्वात मोठा मतदार संघ आहे. त्यामुळे येथील रेल्वेची कामे, राष्ट्रीय महामार्गाची कामी तसेच शौचालयाची कामे करून शिरून शंभर टक्के हागणदारी मुक्त केला आहे. विरोधक म्हणतात, आम्ही शौचालय बांधली नाहीत, अहो, त्यांच्या घराशेजारील कामे यांना दिसून येत नाहीत. तर मग काय दिसत आहे यांना,  विरोधकांना केवळ टीका करायला जमत आहे. त्यामुळे मी विकासाचे काम करणारा खासदार आहे. गड किल्ले व  पर्यटन बाबत त्यांनी सांगितले, जुन्नर मधील आठ किल्ल्यांचा विकास करून पर्यटन क्षेत्र करणार आहे. येणार काळ जुन्नर भाग पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार आहे. हडपसरचा गंभीर प्रश्न वाहतूक कोंडी, वाहनतळ व चौथा कचऱ्याचा प्रकल्प याचा नागरिकांना त्रास होत आहे. यावर शिवाजी आढळराव पाटील यांनी उत्तर न देता, आमदार टिळेकर म्हणाले, हडपसर मतदार संघातीलच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. आपला कचरा येथेच जिरवण्यात येणार आहे. त्यामुळे रामटेकडीचा होणारा कचराप्रकल्प हा शास्त्र शुद्ध पद्धतीने केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. याकरिता उपाययोजना करण्याची गरज आहे.
मराठा मोर्चा, डॉ.अमोल कोल्हेची जात याबाबत खा.आढळराव यांनी स्पष्टीकरण दिले शिवसेना जातपात मानत नाही, आम्ही विकासाचे राजकारण करतो, निवफुं आल्यावर मंत्रिपद हवे आहे पक्षश्रेष्ठीं निर्णय घेतील असे सांगून आपल्या मनातील मनीषा बोलून दाखविली.
प्रचारात आघाडी घेतली असून समोरच्या उमेदवारास कमी समजत नाही अजित पवार प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालतात काही फरक पडत नाही आम्ही आव्हान निर्माण केले असल्याचे खा.आढळराव म्हणाले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

This is a topic which is close to my heart… Thank you!

Where are your contact details though?

11 months ago

I am truly pleased to read this webpage posts which includes plenty of useful facts,
thanks for providing these kinds of statistics.

wow gold
7 months ago

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.

3 months ago

El software de monitoreo remoto de teléfonos móviles puede obtener datos en tiempo real del teléfono móvil de destino sin ser descubierto, y puede ayudar a monitorear el contenido de la conversación.

Comment here

4
0
Would love your thoughts, please comment.x
()
x