पुणे

शिवसेना शहर समनव्यक जयसिंग भानगिरे यांचे हृदयविकाराने निधन; हडपसर मध्ये शोककळा

धक्कादायक…
शिवसेनेचं लोकप्रिय युवानेतृत्व हरपलं….

हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)-
शिवसेना माजी विभागअध्यक्ष,पुणे शहर समनव्ययक
महंमदवाडी-हडपसर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, युवानेते जयसिंगअण्णा
भानगिरे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने शनिवार दि 16 मार्च रोजी पहाटे अकस्मात निधन झाले.
त्यांच्या जाण्याने महंमदवाडी-वासीयांसह भानगिरे परिवाराला मोठा धक्का बसला असून सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वच स्थरांमध्ये जयसिंगअण्णा
भानगिरे यांचा मोठा चाहता वर्ग होता, शिवसेनेचे ते हडपसर मतदार संघात पहिल्या फळीतील युवानेते होते.
नगरसेवक प्रमोद भानगिरे यांचे ते थोरले चुलतबंधू होत, त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी, बंधू असा मोठा परिवार आहे.
आपल्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली होती. महंमदवाडी-काळेपडळ परिसरात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे, विविध संस्था, मंडळे यांना सढळ हाताने मदत करणारा, गरजूंच्या पाठीशी सदैव उभा राहणारा शिवसेनेचा दिलदार युवानेता काळाच्या पडद्याआड गेल्याने कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात असून विविधपक्षीय पदाधिकारी,
लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शिवसैनिक यांनी महंमदवाडी येथे धाव घेतली आहे…त्यांचा अंत्यविधी दुपारी 4 वाजता महंमदवाडी येथे होणार आहे.
रोखठोक महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीनं कै.जयसिंग अण्णा भानगिरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !😢

Comment here