पुणे

हडपसर वाहतूक विभागाकडून जोरदार कारवाई ; नागरिकांकडून कायद्याचा होतोय भंग ; मानसिकता बदलावी – नागनाथ वाकुडे

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
हडपसर वाहतूक विभागाच्या वतीने पुणे-सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा, सासवड रस्त्यावर फुरसुंगी कमान, मगरपट्टा चौक, गणेश मंदिर चौक, ससाणेनगर चौक येथेही कर्मचाऱ्यांची गस्त सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी स्पष्ट केले. मात्र नागरिकांनी लॉक डाऊन चे पालन करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी फाटा येथे कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक पोलीस आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी येथे तैनात आहेत. विनाकामाचे रस्त्यावर आले, अशा 51 जणांवर 188 नुसार कारवाई केली. त्यामध्ये 38 दुचाकी, 6 तीनचाकी आणि 7 चारकी वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर म्हेत्रे, गणेश थोरात, मार्तंड जगताप, कैलास सपकाळ, अंकुश शिवणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

मांजरी फाटा चौक येथे प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांवर कारवाई केली जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना कोरोना व्हायरसचा त्रास होऊ शकतो, यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, अजूनही अनेकांची मानसिकता बदलली नसल्याची खंत वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे यांनी व्यक्त केली.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मांजरी उपबाजार आणि हडपसरमधील
पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडई मागिल चार दिवसांपासून बंद आहे. शहर आणि परिसरातील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, सोलापूर रस्त्यावर वैदूवाडी चौकातील वाहतूक शाखेसमर भाजीविक्रेते खुले आम दिवसभर व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अधिकारी घेत आहेत कुटुंबाची काळजी
कोरोना व्हायरस पादुर्भाव वाढत असताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे, पिंपरी चिंचवड येथून हडपसर येथे ड्युटी करणारे वाहतूक पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी साहेब ड्युटी संपल्यावर घरी जातात त्यांनी टेरेस ला वेगळी व्यवस्था केली आहे, घरातील 75 वर्षाचे वडील व कुटुंबाची ही दक्षता घेतात, नागरिकांच्या सुरक्षिततेसह कुटूंबाची काळजी अशी दुहेरी भूमिका पोलिसांना निभवावी लागत आहे.

Comment here