कात्रजमध्ये ५.७९ कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त; येरवड्याचा तस्कर अटकेत!

Rokhthok Maharashtra 31 0

पुण्यातील कात्रज चौकातून गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ५ कोटी ७९ लाख रुपयांचा मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केला आहे. या कारवाईत येरवड्याशी संबंधित एका तस्कराला अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कात्रज चौकातील नवीन उड्डाणपुलाखाली सावंत कॉर्नरजवळ सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपीकडून २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ५ कोटी ७९ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात सुरेश प्रशांत सावंत (वय ३८) याला अटक करण्यात आली असून तो मूळचा येरवड्याचा असून सध्या लोहगाव रोड परिसरात राहत होता. आरोपीकडून ड्रग्जसह मोबाईल आणि इतर मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या ड्रग्ज रॅकेटमागील इतर आरोपी आणि पुरवठादारांचा शोध पोलीस घेत आहेत

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.