एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल! अचानक प्रकृती बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार

Rokhthok Maharashtra 32 0

मोठी बातमी! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.”
मुख्य बातमी 
“मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळी अधिवेशनातील व्यस्त कार्यक्रम आणि ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेमुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांची मोठी धावपळ सुरू होती. अधिवेशनादरम्यान त्यांना तापही आला होता, मात्र त्यांनी काम सुरूच ठेवले. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.”
“दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.”
“सध्या डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली असून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.