पिंपरीत बिष्णोई गँगचा थरार! भररस्त्यात 6 राऊंड फायरिंग AJ मॉलवर धडाधड गोळ्या

Rokhthok Maharashtra 18 0

पिंपरी चिंचवडमध्ये काल रात्री अक्षरशः थरार उडाला… भररस्त्यात बाईकवरून आलेल्या दोन शूटरनी थेट एजे फर्निचर मॉलवर पाच ते सहा राऊंड गोळीबार केला… आणि या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतल्याचा दावा समोर आलाय… नेमकं काय घडलं? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट…पिंपरी चिंचवडमधील एजे फर्निचर मॉल परिसर… रात्री साधारण 9 वाजून 20 मिनिटांची वेळ… आणि अचानक दोन तरुण दुचाकीवरून येतात…

क्षणात दोन पिस्तुल बाहेर काढली जातात… आणि मॉलच्या दिशेने धडाधड गोळीबार सुरू होतो…

पाच ते सहा राऊंड फायरिंग… गोळ्यांचा आवाज… फुटलेल्या काचा… आणि परिसरात भीतीचं वातावरण…

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.या गोळीबारामागे लॉरेन्स बिष्णोई गँगचा हात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शुभम लोणकरच्या शूटरनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांना याआधी सोशल मीडियावरून धमक्या देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

धमकीच्या संदेशात “हा फक्त ट्रेलर आहे… पुढची गोळी थेट डोक्यात असेल…” असा इशाराही देण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे.दरम्यान, आरजू बिष्णोईच्या नावाने एक ऑडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला जातोय.

मात्र हा ऑडिओ खरोखरच बिष्णोई गँगशी संबंधित आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांनी सांगितलं की,
“घटनास्थळी पथक रवाना करण्यात आलं असून आरोपींचा शोध सुरू आहे.”मुंबईनंतर आता पुण्यातही बिष्णोई गँगची एंट्री झाल्याची चर्चा रंगली आहे… पुणे हे विद्येचं माहेरघर की गुन्हेगारांचं अड्डं? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.