मगरपट्ट्यात कालवा फुटला! लाखो लिटर पाणी वाया, रस्त्यावर पूर; वाहतूक ठप्प

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातील मगरपट्टा परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे…
औद्योगिक वसाहतीमध्ये कालवा फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेलं आहे…
मध्यरात्री अचानक कालवा फुटल्याने
आणि काही क्षणातच प्रचंड वेगाने पाणी रस्त्यावर येऊ लागलं…
परिस्थिती इतकी गंभीर होती की रस्त्यावर अक्षरशः पूर आल्यासारखी अवस्था निर्माण झाली…
दुभाजकाच्या लेव्हलपर्यंत पाणी साचलं होतं…
यामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली…अनेक वाहनं तासन्तास रस्त्यावर अडकून पडली…
एकीकडे उन्हाळा सुरू असून शहरात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे…
तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी अशा प्रकारे वाया गेल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे… मगरपट्टा सिटी व परिसरात पाणीच पाणी झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं…

दरम्यान, माजी उपमहापौर निलेश मगर यांनी घटनास्थळी पाहणी केली…
आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले…
मात्र, नागरिकांचा आरोप आहे की…कालव्यांच्या देखभालीकडे अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाहीत…

यामुळेच अशा घटना वारंवार घडत आहेत…ग्रामीण भागात लोकांना पाण्याची टंचाई सहन करावी लागत असताना…
शहरात मात्र लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे…
प्रशासन आता या घटनेतून धडा घेणार का?
आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा बसणार का?
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.