“मनोज जरांगे पाटील यांच्या आढळराव पाटलांना शुभेच्छा… “तुळापूर येथे अपूर्व आढळराव पाटील यांनी घेतली भेट..

Rokhthok Maharashtra 13 0

पुणे प्रतिनिधी स्वप्निल कदम
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 335 व्या बलिदान दिनानिमित्त श्रीक्षेत्र तुळापूर येथील संभाजी महाराज समाधी स्थळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चिरंजीव अपूर्व आढळराव पाटील यांच्याशी भेट झाली उपस्थितांनी आढळराव पाटील यांच्या पुत्राची ओळख करून देता असताना उमेदवार शिवाजीदादांचे अपूर्व हे चिरंजीव असल्याचे सांगताच जरांगे पाटलांनी अपूर्व यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी तुळापूरच्या सरपंच ऍड.गुफा इंगळे, उपसरपंच जयश्री शिवले, माजी खासदार तथा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चिरंजीव अपूर्व आढळराव पाटील, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद विपुल शितोळे, माजी उपसरपंच पवन खैरे, नवनाथ शिवले, राजाराम शिवले, सुरेखा शिवले, ग्रामपंचायत सदस्य वर्षा शिवले, सुवर्णा शिवले, सुवर्णा राऊत, अर्चना पुजारी यांसह ग्रामस्थ व शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संभाजी महाराज बलिदान दिवस हा मराठ्यांसाठी अत्यंत वाईट व काळा दिवस आहे आमच्या राजांनी आपल्या न्यायासाठी स्वतःचा देह सुद्धा आपल्याला दिला राजांचे हे बलिदान कधीच विसरून जमणार नसल्याचे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.