राष्ट्रीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धा वडकी येथे संपन्न
वडकी/पुणे:- (रोखठोक महाराष्ट्र प्रतिनिधी)
संजय मोडक एज्युकेशन सोसायटीचे मोडक इंटरनॅशनल स्कुल व संजय मोडक ज्युनिअर काॅलेज मध्ये 64 व्या राष्ट्रीय शालेय कुराश (कुस्ती ) स्पर्धा 2018 -2019 मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन हवेली भाजपचे अध्यक्ष पंडित दादा मोडक यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय मोडक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय मोडक होते.
मोडक इंटरनॅशनल स्कुल मध्ये जवळ पास 12 राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी या माध्यमातून मिळाली. तसेच विद्यार्थ्यांचा नवीन दिशा मिळाली. कार्यक्रमप्रसंगी गौरव दिक्षित ( मार्केटिंग हेड) स्कुल गेम फेडरेशन आॅफ इंडिया ) सचिव शिवाजी साळुंखे, योगेश उंटवाल , रवि कपुर,गौरवभाऊ कामठे, पै. दत्ता गायकवाड, समिर झेंडे, अशोक मोडक, वडकी गावातील ग्रामस्थ, शासकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संचालक तुषार मोडक, मनिषा मोडक, मारूती कटके, साधना कटके, रूपाली मोडक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मोडक इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य श्रुतीरंजन बारिक, प्रा. स्नेहल जाधव, अमोल शिळीमकर, नारायण गायकवाड, संजय मेंगे, सुनिल राउत, आशा धुमाळ, उज्ज्वला पवार, सर्व शिक्षक वृंद यांनी केले.





