सोलापूर हादरलं! पूजेच्या नावाखाली भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार

Rokhthok Maharashtra 1 0

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे.
पूजा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली एका भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
आरोपी मनोहरमामा भोसले याच्याविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक आणि धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, घरातील आर्थिक अडचणी आणि नोकरीच्या समस्येमुळे ती चिंतेत होती.
याच दरम्यान एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून ती पुण्यातील वडाचीवाडी येथे आरोपीच्या आश्रमात गेली होती.
भोंदूबाबाने पूजा आणि अडचणी दूर करण्याचं आमिष दाखवत महिलेकडून तब्बल ११ हजार रुपये घेतले.
यानंतर आश्रमात राहण्यासाठी स्वतंत्र खोली देण्यात आली.
तक्रारीनुसार, पहाटेच्या वेळी आरोपी महिलेच्या खोलीत शिरला आणि विशेष पूजेचा बहाणा करत कपडे काढण्यास सांगितले.
महिलेने वारंवार नकार दिला… पण आरोपीने जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप करण्यात आला आहे.
इतकंच नाही, तर हा प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे.
दीड वर्ष भीतीत राहिल्यानंतर अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली असून करमाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.