पुणे
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये एम. ए. मास कमुनिकेशन अँड जर्नलिझम, एम. ए., एम एस्सी. भूगोल, एम. ए. अर्थशास्त्र ,एम .एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री, एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी, एम एस्सी. फिजिक्स, एम. एस्सी. कम्प्युटर सायन्स, बी. ए. राज्यशास्त्र, मानसशास्त्र, बी.एस्सी. बॉटनी, गणित इत्यादी विषयांना परवानगी मिळाली असल्याची माहिती एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली. या कॉलेजमध्ये वरील अभ्यासक्रम सुरु करावा अशी विद्यार्थ्यांची व पालकांची मागणी होती. त्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिल्यामुळे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे . प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी सांगितले.