पुणे

“काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रवादी कार्यालयास भेट अन जाग्या झाल्या जुन्या आठवणी”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाला
आज पुणे शहरातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष प्रशांत जगताप माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रवक्ते अंकुश ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री उल्हास दादा पवार, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश महिला माजी अध्यक्षा कमलताई व्यवहारे, माजी आमदार दीप्ती चौधरी, मनपा गटनेते आबा बागुल, ज्येष्ठ सभासद अरविंद शिंदे, महिला अध्यक्ष सोनाली मारणे,गोपाळ तिवारी, अजित दरेकर, वीरेंद्र किराड, नीता परदेशी,लता राजगुरू, विशाल मलके, रमेश अय्यार इत्यादी मंडळी यावेळी उपस्थित होती. दादांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला काँग्रेस भवन चा थोडक्यात इतिहास सांगितला अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर यांनी देखील त्यांच्याअध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील ठळक घटना सांगितल्या. अरविंद शिंदे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत जशास तसे वागावे असे सांगितले. दोन तास हास्यविनोद गप्पांचा फड रंगला होता, उल्हास दादा म्हणाले राष्ट्रवादी कधी काँग्रेस भवन मध्ये येतील तर कधी काँग्रेस वाले राष्ट्रवादी भवनमध्ये जातील, त्यावर अंकुश काकडे म्हणाले आमच्याकडे कायमचं कोणाला य्यायचं असेल तर त्याचे देखील स्वागत होईल. दोन्ही बाजूने एकमेकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x