पुणे

#NCP माजी नगरसेविकेच्या चिरंजीवाची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी – राष्ट्रवादीत इन्कमिंग जोरात

कॅन्टोन्मेंट:माजी नगरसेविका हिना मोमीन यांचे चिरंजीव आतिक मोमीन यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने त्यांची घरवापसी झाली आहे. आतिक मोमीन यांच्या मातोश्री हिना मोमीन या 2012 साली राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या. तसेच 2019 साली विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी व काँग्रेसची युती असल्यामुळे त्यांना तिकीट मिळाले नाही.

त्यामुळे हिना मोमीन आणि त्यांचे चिरंजीव आतिक मोमीन यांनी नाराजी पत्कारून एमआयएम पक्षात प्रवेश केला. यावेळी 2019 च्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात हिना मोमीन या एमआयएममधून उमेदवार होत्या. मात्र, या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. आतिक मोमीन पूर्वी पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. आतिक म्हणाले की, माझ्या कामाची पद्धती आणि विचारसरणी राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याने एमआयएममध्ये काम करताना घुसमट होत होती, त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काम करणार असल्याने बॅक टू पॅव्हेलियन केल्याचे त्यांनी सांगितले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x