पुणे

पुणे सोलापूर महामार्गावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना व्हावी ; मांजरी बुद्रुक शिष्टमंडळाची पोलीस उपायुक्तांकडे मागणी

पुणे (प्रतिनिधी)
पुणे सोलापूर महामार्गावर नियंत्रण नसल्याने अपघात घडत आहेत, अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित वाहतूक होण्यासाठी वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) बसवावेत अशी मागणी आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी बुद्रुक शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.
पुणे सोलापूर महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे, वाहनांची भाऊगर्दी अन त्यावर नसलेले नियंत्रण यामुळे अनेक अपघात घडतात, परिसरातील वाहनचालक व नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे, ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार चेतन तुपे यांच्या लेटरहेडवर पत्र लिहून शिष्टमंडळाने उपायुक्त श्रीरामे यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळात माजी उपसरपंच राहुल घुले, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग राज्य संघटक सचिव मंगेश मोरे, सुधीर घुले, बालाजी अंकुशराव, योगेश घुले, अमोल मोरे, व पीएमपीएमएल अधिकारी उपस्थित होते.


मांजरी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राजवल पंक्चर सिंगल करणे, व सिग्नल बसविणे रंबलर टाकणे व शेवाळवाडी, पीएमपीएमएल येथील बॅरिकेट्स काढणे बाबत निवेदन दिले आहे, पोलीस उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आमदार चेतन तुपे व पोलीस उपायुक्त समक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत आणि येथे उपाययोजना केली जाणार आहे.
मंगेश मोरे
संघटक सचिव – चित्रपट, कला सांस्कृतिक विभाग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Comment here