(पुणे)-
कोराना महामारीचा कहर सुरूच आहे. कोरोना काळात विविध सामाजिक बांधिलकी च्या माध्यमातून “मोफत डॉक्टर हेल्पलाइन” व संपूर्ण महाराष्ट्र भर मोफत आरोग्य शिबीर घेणारे संचालक डॉ रोहित बोरकर व टिम ने पुणे शहराच्या मध्यभागी नागरीकांनासाठी “चिरॉन हेल्थ प्लस पॉलिक्लिनिक ” पुणे स्टेशन परिसरात सुरू केले आहे. सर्व आरोग्य सुविधा व विविध तज्ञ डॉक्टर चा सल्ला सदर दवाखाना मध्ये मिळेल.
“कोरोना काळात महत्वपूर्ण जबाबदारी निभावणारे व देशाचे रक्षण करणारे
पोलिस व जवाना करीता सदर ठिकाणी मोफत बाह्यरूग्ण तपासणी फी असेल ” असे संचालक डॉ रोहित बोरकर संबोधले.
सदर पॉलिक्लिनिक चे उद्घाटन रूबी हॉल क्लिनिक पुणे व ग्रांट मेडिकल फाउंडेशन चे मँनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रांट सर यांच्या हस्ते उत्साहात झाले.
प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या डॉ मानसी जाधव, बंड गार्डन पी. आय. काळे साहेब, सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन उपाध्यक्ष सौ अर्चना पाटील, संचालिका डॉ सोनाली बोरकर, ह्युमन राईट्स कार्यकर्त्या कु नेहालिका चव्हाण, प्रोलाईफ चे संचालक श्री कांत कड, भाजपा आघाडी उपाध्यक्ष शैलेश काची, डॉ श्रद्धा रासगे, डॉ सार्थक बेंगाळ, डॉ शरद कारंडे, डॉ रूचिका कर्चे , डॉ नेहा कारंडे, डॉ प्रियंका कोटवाल, डॉ कल्पना राठोड, डॉ नम्रता शिंदे, डॉ महेश इसाकपल्ली, डॉ सचिन दुरक्कर, श्री राजू सहाणे धर्म राज शिरूरे सह डॉक्टर टिम उपस्थित होती. सदर दवाखाना सकाळी १० ते २ व सायं ४-९ ह्या वेळेत सुरू राहिल. हेल्पलाइन क्र. 02026125144, 9175716991, 8286112112,
मोफत शस्त्रकिया मार्गदर्शन, शासकीय आरोग्य योजना माहिती, मोफत शिबीरे, शस्त्रक्रियेला अर्थिक मदत मार्गदर्शन, जेष्ठ नागरीकांना रविवारी मोफत मधुमेह तपासणी असेल.