Uncategorizedपुणे

तरूणीला फुस लावून घरी आणून तिच्यावर सामुहिक बलात्कार ; चौघांना दत्तवाडी पोलिसांनी केली अटक

पुणे : (ROKHTHOK MAHARASHTRA ONLINE ) –  25 वर्षीय तरूणीला फुस लावून घरी आणून तिच्यावर सामुहिक बलात्कार करणार्‍या चौघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जनता वसाहतीत  सायंकाळी घडली. सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

श्रीकांत सरोदे (वय 36), आदित्य ऊर्फ सन्या पवार (वय 19), सुर्वेश जाधव (वय 36) आणि आशिष मोहिते (वय 18, सर्व रा. जनता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर  यांनी माहिती दिली. भारती विद्यापीठ  परिसरात राहणारी एक 25 वर्षाची तरुणी स्वारगेटवरुन शुक्रवारी सायंकाळी घरी जात होती. यावेळी आरोपींपैकी एकाने तिला जनता वसाहतीत आणले.

त्यानंतर त्याने इतरांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून तिच्यावर एका मागोमाग एक बलात्कार केला. हा सर्व प्रकार सुरु असताना या तरुणीच्या रडण्याचा आवाज आल्याने गल्लीत राहणार्‍यांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना कळविले. दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले व या तरुणीची सुटका करुन चौघांना अटक केली.

या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.
दत्तवाडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरूध्द सामुहिक बलात्काराचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास दत्तवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.