पुणे

राजाभाऊ होले यांची शिवसेना उपशहरप्रमुख पदी निवड

पुणे / हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
फुरसुंगी, तुकाईदर्शन येथील राजाभाऊ होले यांची शिवसेनेच्या उपशहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहरप्रमुख संजय मोरे यांनी नुकतेच त्यांना त्याबाबतचे पत्र दिले आहे


राजाभाऊ होले १९८७ पासुन हडपसर शिवसेना स्थापनेपासुन कार्यरत आहेत, ससाणे नगर शाखाप्रमुख ते हडपसर विभाग प्रमुख पर्यंत संघटनात्मक जवाबदारी समर्थपणे पेलली. ४ मे१९९४ रोजी ससाणे नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा गनिमी काव्याने रात्रीत स्थापन, आजतागायत छ.शिवाजी पुतळा समितीचा अध्यक्ष, फुरसुंगी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना, त्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी कार्य केले. प्रशासकीय कार्याचा त्यांना अनुभव आहे. फुरसुंगी, हडपसर परिसरात लोककल्याण प्रतिष्ठान, लोककल्याण ना.सह.पतसंस्था,लोककल्याण शिक्षण संस्था, राजे स्मारक, साई समर्थ गजानन चॕरिटेबल ट्रस्ट, आदर्श सार्वजनिक वाचनालय, शिवशंकर पतसंस्था, अशा विविध सामाजिक सस्था उभारणीत सक्रिय सहभाग व त्यामाध्यमातुन सामाजिक कार्य करण्यात त्यांचा पुढाकार असतो.