पुणे

“लोककल्याण नगरी पतसंस्थेची वार्षिक ऑनलाईन सभा”-“अरुण शिंदे यांना पाचवा लोककल्याण सहकार गौरव पुरस्कार प्रदान”

हडपसर : कोरोना च्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींना कर्ज स्वरुपात आर्थिक सहाय्य करुन, कर्जदारांनाही हप्तात सवलत देऊन लोककल्याण नागरी पतसंस्थेने सामाजिक भान जपले आहे. असे प्रतिपादन लोककल्याण प्रतिष्ठान व पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी अध्यक्षस्थानावरुन केले. तुकाई दर्शन येथे लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात आली.यावेळी सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे लोककल्याण पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण शिंदे यांना पाचवा ” लोककल्याण सहकार गौरव ” पुरस्कार -२०२१ लोककल्याण प्रतिष्ठान,पतसंस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे सचिव हरिश्चंद्र कुलकर्णी,संचालक प्रा.एस.टि.पवार, डॉ.स्वप्निल लडकत,संपत पोटे,सुयोग भुजबळ,छाया दरगुडे,राजश्री भुजबळ व्यवस्थापिका योगिता पालिवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष कदम यांनी तर आभार मच्छिंद्र पिसे यांनी मानले.ऑनलाईन प्रयोजन अथर्व सातव व स्वरांजली होले यांनी केले.