पुणे

आंतरराज्यातील गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या चंदननगर पोलिसांची कामगिरी ः तीन लाख ८५ हजार ६५० रुपयांचा ऐवज जप्त

रोखठोक महाराष्ट्र न्युज

पुणे ः अॅपल कंपनीचा मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ विकण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यातील गुन्हेगारांना चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून तीन लाख ८५ हजार ६५० रुपयांचा ऐवज जप्त केला.इक्रान सुलेमान मलिक (वय ३९), अल्लाउद्दीन अलीमउद्दीन मलिक (वय ३७ रा. दोघे सपोंडा, गझियाबात उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, चंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खराडीमध्ये दोघेजण अॅपल कंपनीचे मोबाईल कस्टममधून विकत घेतल्याचे सांगून विक्री करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून दोघांना बजाज चेतक ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अॅपल कंपनीचे तीन मोबाईल फोन, लॅपटॉप व वॉच असा एकूण तीन लाख ८५ हजार ६५० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, त्यांनी गुन्हा कबुल केला.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील जाधव, पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार अमित कांबळे, सुभाष आव्हाड, राहुल इंगळे, नामदेव गडदरे, अतुल जाधव, महेश नाणेकर, संदीप येळे, श्रीकांत शेंडे, गणेश हांडगर, शकूर पठाण, तुषार भिवरकर, युसूफ पठाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.