पिंपरी : कौटुंबिक कलहातून पोटच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला विषारी औषध पाजून खून करणाऱ्या आईला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सत्र न्यायाधीश जी पी अग्रवाल यांनी हा निकाल दिला मुलाचा खून केल्यानंतर आईनेही विष घेऊन गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला पिंपरी चिंचवड मधील तळवडे येथे पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. स्वाती विक्रम माळवदकर वय वर्ष 25 रा.बोरकर वाडी सुपा शिक्षा सुनावलेल्या निर्दयी महिलेचे नाव आहे स्वाती यांचे दीर श्रीकांत माळवदकर वय 30 यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.2ऑगस्ट 2016 मध्ये ही घटना घडली होती .याबाबतची माहिती अशी की फिर्यादी पत्नी भाऊ विक्रम वहिनी स्वाती पुतण्या निशिगंध आणि आई-वडिलांसह एकत्र राहत होते .स्वातीला ते मान्य नसल्याने तिचे सासू-सासरे गावी राहत होते .सर्वांनी एकत्र राहावे अशी विक्रमची इच्छा होती .त्यामुळे विक्रम आणि स्वाती यांच्यात वाद होत होता घटनेच्या दिवशी विक्रमने स्वातीला फोन केला असता तिने तो उचलला नाही .त्यामुळे विक्रमने फिर्यादी ना घरी जाण्यास सांगितले फिर्यादी घरी आले असता निशिगंध चटईवर चादर पांघरुन झोपलेला आणि स्वाती बेशुद्ध पडलेल्या दिसल्या फिर्यादीने दोघांना रुग्णालयात दाखल केले .डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले स्वाती ला काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाला या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिली त्यांना एडवोकेट मनोज बिडकर यांनी मदत केली.
पोटच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला विषारी औषध पाजून खून करणाऱ्या आईला जन्मठेपेची शिक्षा
November 20, 20210

Related Articles
April 1, 20210
हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये वृत्तपत्र विक्रेत्याचा उपचाराविना मृत्यू हॉस्पिटल प्रशासनाचा दोष नाही – सह्याद्री हॉस्पिटल
पुणे ः प्रतिनिधी
हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये विक्रेत्याचा उपच
Read More
September 29, 20210
महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – उपसभापती निलमताई गोऱ्हे महिला सुरक्षेबाबत बैठक
पुणे दि. 29 : राज्य शासन महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून महि
Read More
July 23, 20230
काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक ऐक्याचा संकल्प
आज सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या
Read More