पुणे

दिघे येथील लॉजवर तरुण तरुणीचा नग्नावस्थेत मृतदेह

पिंपरी चिंचवड मधील एका लॉजमध्ये जोडप्याचा मृतदेह आढळून आला आहे. दोघांचेही मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील दिघी येथील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पिंपरी चिंचवड परिसरातील दिघी येथे असलेल्या अथर्व लॉजमध्ये जोडप्याचा मृतदेह आढळून आला आहे. हे जोडपं कोण आहे? त्यांची नावे काय आहेत तसेच कुठले निवासी आहेत याबाबतची अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. पण दोघांचेही मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्येचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असला तरी याप्रकऱणी पोलीस विविध अँगलने आपला तपास करत आहेत.