पुणे

पिस्तुलाच्या धाकाने दुकानदारांत दहशत पसरविणारे तिघे जेरबंद

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख हडपसर मध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानदारांना धमकावून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी हडपसर परिसरातील भेकराईनगरमधील शिवशंकर हाईट्स येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

शुभम रमेश कवडे, संजय राजेंद्र पवार, विशाल दादा शिंदे असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी मयूर मधुकर यादव (वय ३०, अॅस्ट्रिया ग्रॅन्ड सोसायटी, हांडेवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे भेकराईनगर येथे दुकान आहे. २४ नोव्हेंबरला दुपारी सव्वातीनच्या सुमारास तिघे जण त्यांच्या दुकानाजवळ आले. त्यातील एकाने फिर्यादी यांना पिस्तूल दाखवून ‘दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, मी सांगितल्याशिवाय दुकान उघडायचे नाही, आधीच एकाला वर पोहोचवला आहे. त्यात आता तुझा नंबर लावून घेऊ नको, असे ओरडत दुकानदारांना शिवीगाळ करीत परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.