पुणे

वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी :-अमन शेख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट ६ च्या हद्दीमध्ये गस्त करत असताना पो.अं. सचिन पवार यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, वाहनचोर बाळू गोडसे याचेकडे चोरीची वाहने असुन तो बाड़े बोल्हाई. डोंगर माथा येथे येणार आहे. सदरची बातमी  गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६. यांना दिली असता पोलीस पथक पोउनि सुधीर टेंगले, व युनिट ६ कडील स्टाफ असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी वाडे बोल्हाई डोंगर माथा याठिकाणी जावुन शोध घेतला असता मिळालेल्या बातमीप्रमाणे एक सवशीत वेक्ती वाडे बोल्हाई, डोंगर याठिकाणी उभा असलेला दिसुन आला. पोलिसांनी मोठ्या शिताफिने त्याला ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव बाळु राणवा
गोडसे वय २८ वर्षे रा. मु.पो. टाकळी लोणार ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर सध्या रा. बो-हाटे नगर पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्या कडे ३ मोटारसायकल व एक रिक्षा मुद्देमाल मिळून आला सदरच्या मोटार सायकल व रिक्षा बाबत त्यास विश्वासात घेवून सखोल चौकशी करता, त्याने सदरची वाहने पुणे शहरातुन, व
सातारा येथुन चोरल्याचे कबुली दिली.
आरोपीकडुन एकुण ३ मोटार सायकल व एक रिक्षा असे ६२०००/-रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोउनि सुधीर टेगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन घाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.