पुणे

पत्रा उचकटून चोरांनी केला डाव . लोणी काळभोर येथील घटना

प्रतिनिधि : स्वप्नील कदम

                      पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ( ता. हवेली ) फाटा येथील किराणा दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून दुकानातील दोन लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे.

                              पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी दुकानदार प्रदीप मारुती क्षीरसागर ( वय. ३० वर्षे, रा. मोगले वस्ती, बाजार मळा, लोणी काळभोर ता.हवेली ) यांनी अज्ञात चोरटयां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप क्षीरसागर यांचे पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर फाटा, बस स्टॉप शेजारी किराणा मालाचे दुकान आहे. दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी दुकान उघडले असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. पाहणी केली असता पोटमाळ्याचा मागील कोपऱ्यातील पत्रा उचकटलेला दिसला. अज्ञात चोरटयांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सिगारेट, चाॅकलेट, वेगवेगळ्या प्रकारचे खोबरेल तेल असा एकुण १९९१३८/ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे दिसले. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.