पुणे

लोणीकंद पोलीसस्टेशन हद्दीत सराईत एक वर्षासाठी स्थानबद्ध, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात रवानगी

हवेली प्रतिनिधी :- अमन शेख

लोणीकंद पोलिसस्टेशन हद्दीत लोकांवर भाईगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले असून त्याची रवानगी औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,केसनंद परिसरात राहणारा आकाश गणपत माने (वय 22 वर्ष) हा वाघोली, लोहगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात नागरिकांवर दहशत निर्माण करत असे त्यामुळे नागरिकात दडपण येत होते त्याच्याकडून कायमच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस आमलदार सागर कडू यांनी या सराईतावर असलेल्या गुन्ह्याचा अभिलेख तपासून त्याचेवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई होण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता त्यावर त्यांनी या सराईत गुन्हेगारा एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले असून त्याची रवानगी औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृह करण्यात आलेली आहे