पुणे

कान्हूरच्या प्रथमेशला मिळाला एल एन ४ कृत्रिम हात

दि. २५/१२/२०२१ रोजी महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्र मध्ये कान्हुरच्या प्रथमेश मिडगुले याला एल एन ४ कृत्रिम हात बसवण्यात आला. प्रथमेश चा हात कडबाकुट्टीमध्ये कापला गेला होता. एल एन ४ कृत्रिम हात अमेरिकेतून एल एन मिडोज या संस्थेतून येतो, हा हात अत्याधुनिक, सोपा, सुटसुटीत, वापरण्यास सोपा आहे. या कृत्रिम हातामुळे प्रथमेशचे आयुष्य बदलून जाणार आहे, त्याला दैनंदिन कामे करण्यास मोठी मदत होणार आहे. महाराष्ट्र आरोग्य मंडळ व रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने सानेगुरुजी आरोग्य केंद्रांमध्ये एल एन ४ कृत्रिम हाताचे कायमस्वरूपी केंद्र सुरू आहे. प्रत्येक शनिवारी दुपारी २-०० वा. हात बसवण्यात येतात. दि. २२/१२/२०२१ रोजी सकाळ पेपरच्या बातमीची दखल घेऊन प्रथमेशला एल एन ४ कृत्रिम हात आज बसवण्यात आला. श्री. अमोल झगडे यांनी हात बसला व श्री. हसनमीया शेख यांनी हात वापरण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव श्री. अनिल गुजर, रोटरी क्लब ऑफ पूना डाऊनटाऊनचे रो. प्रदीप मुनोत, रो. जितू मेहता, विद्याधाम विद्यालय कान्हूर मेसाई ता. शिरूर जि. पुणे चे मुख्याध्यापक श्री. अनिल शिंदे प्रथमेशची आई सौ. सविता मिडगुले, सोमनाथ राक्षे, निलेश खरडे, सोमनाथ पिंगळे, सुनील जिते हे होते.