हवेली

३० घरफोड्या उघडकीस गुन्हे शाखा युनिट 6 ची धडाकेबाज कामगिरी

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख

गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने  घरफोडीचे तब्बल ३०  गुन्हे उघड केले असून याप्रकरणी एका सराईतास गजाआड केले आहे त्याच्याकडून तब्बल 31 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट सहा मधील पथक हद्दीत गस्तीवर असताना एका खात्रीलायक बातमी दाराकडून माहिती मिळाली की घरफोडी गुन्ह्यातील एक सराईत गुन्हेगार अर्जुनसिंग दुधाने व त्याचे साथीदार यांनी केले असून तो रामटेकडी हडपसर येथे येणार असल्याची माहिती मिळाली यावर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश माने यांना यासंदर्भात माहिती देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे सदर ठिकाणी सापळा रचला त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने अर्जुन सिंग राजपूत सिंग दुधाने राहणार पाण्याची टाकी जवळ मांजरी बुद्रुक असे सांगितले त्याच्याकडे पोलीस संदर्भात अधिक माहिती घेतली असता हा गुन्हा त्याने त्याचे साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले त्याच्या पोलीस कोठडी दरम्यान पुणे शहराच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात केलेल्या एकूण तीस घरफोड्या उघड झाल्या असून यात चार चाकी वाहनासह सहाशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ७८० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व पंचावन्न हजार रुपये रोख असा ३१ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

      ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगळे, पोलिस अमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंडे, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाने, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, प्रतीक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश खेडेकर, शेखर नितीन घाडगे, ज्योती काळे व सुहास तांबे कर यांनी गेली.