हवेली

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना हिरो ई बाईक चॅम्पियनशिपमध्ये उपविजेते पद

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख

स्किल, इनोव्हेशन आणि एम्प्लॉयबिलिटी प्रोग्राम (SIEP) हिरोद्वारा संचालित आयएसआयई इंडिया (इम्पीरियल सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनीअर्स) द्वारा नुकतेच आयोजित एसआयईपी हिरो इ-बाईक चॅलेंजमध्ये एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांच्या संघाला टिकाऊपणा चाचणीत प्रथम पारितोषिक, ऑफ-रोड चाचणीमध्ये दुसरे पारितोषिक मिळाले आणि एकूण हिरो ई बाइक चॅम्पियनशिपमध्ये उपविजेते पद मिळाले.
एमआयटी एडीटी विद्यापीठा, लोणी काळभोर, पुणे येथील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाच्या एलेडोरोस या विद्यार्थ्याच्या संघाने नुकताच सहभाग घेतला होता. या संघात विद्यार्थी शुभम तायडे (कर्णधार), अब्दुल लतीफ नवरंगे (उपकर्णधार), अय्यान शेख, समेश पवार आणि आणखी 17 सदस्य होते. प्रा. शशांक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हे चॅलेंज जिंकले. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण 18 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये तांत्रिक तपासणी, ब्रेक चाचणी, प्रवेग चाचणी, टेकडी चढाई चाचणी, ऑफ-रोड चाचणी, वजन चाचणी, वाहन चालवण्याची मोड चाचणी, 300 किलो स्लेज पुल चाचणी आणि 45 मिनिटांची सहनशक्ती चाचणी यांचा समावेश होता. आमच्या संघाला टिकाऊपणा चाचणीमध्ये प्रथम पारितोषिक, ऑफ-रोड चाचणीमध्ये द्वितीय पारितोषिक मिळाले आणि एकूण हिरो ई बाइक चॅम्पियनशिपमध्ये उपविजेते पद मिळाले.
आम्ही बजाज डिस्कवर 100 सीसी बाईक रीट्रोफिट केली आहे आणि तिची इकॉनॉमी मोडमध्ये 70 किमी per charge आणि स्पोर्ट्स मोडमध्ये speed of 55 किमी प्रति तास या टॉप स्पीडची श्रेणी आहे. आम्ही आमच्या बाईकसाठी आरोग्य निरीक्षण प्रणाली स्थापित केली आहे. आमच्या वाहनाची बॅटरी फक्त 12 रुपयांमध्ये फुल चार्ज होते, असे मत मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुदर्शन सानप यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंगचे प्रिन्सिपल डॉ. किशोर रवांदे यांनी अभिनंदन करत पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.