पुणे

सोनसाखळी चोरांना केले गजाआड लोणी काळभोर पोलिसांची करवाही

हवेली प्रतिनिधी :-अमन शेख

लोणी काळभोर पोलिसांनी दोन सोनसाखळी चोरांना गजाआड करून त्यांच्याकडून एक लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

           लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे अमलदार शैलेश कुदळे व राजेंद्र दराडे हे परिसरात गस्त घालत असताना एका बातमीदाराने कडून माहिती मिळाली की दोन सोनसाखळी चोर कदमवाकवस्ती परिसरात येणार आहेत यावर त्यांनी वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू  महानोर यांना माहिती दिली त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या सूचनेनुसार पोलीस पथक घेऊन सापळा रचून त्या दोन आरोपींना गजाआड करण्याच्या सूचना दिल्या यावर सापळा रचून १)शहारुख सलीम शेख, रा. कदमवाकवस्ती मूळ राहणार मुरूड जिल्हा लातूर व हरीश किसन कोळपे रा. वाडेबोल्हाई ता. हवेली यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अंगझडती केली असता सोन्याचे दागिने मिळून आले त्यांच्याकडे अधिक माहिती घेतल्यावर त्यांनी ही हे चोरी कोरेगाव ता. शिरूर येथे चालत्या रिक्षा तून मोटारसायकलवरून हिसकावल्याचे सांगितले

     त्यांच्याकडून रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केलेली सोन्याची दागिने व गुन्ह्यात वापरलेली पल्सर गाडी असा एकूण रु १ लाख ४२ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पुढील तपासासाठी त्यांना रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

        ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक अमित साळुंखे संभाजी देवीकर,श्रीनाथ जाधव,पोलीस शिपाई राजेंद्र दराडे,शैलेश कुदळे बाजीराव वीर यांच्या पथकाने केली.