पुणे

लोणी काळभोर कदम-वाकवस्ती येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

जय जय भवानी, जय जय शिवाजी… छत्रपती शि्वाजी महाराज की जय.. अशा विविध जयघोषात लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडीसह परिसरातील गावांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त” विविध राजकीय पक्ष व गावातील स्थानिक मंडळांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम घेण्यात आले.

तसेच लोणी काळभोर कदम-वाकवस्ती मध्ये १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील युवकांनी समाज्या समोर एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात राजेसाहेब प्रतिष्ठान मधील सर्वच कार्यकर्त्यांनी खूप उत्साहमध्ये नियोजन केले सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजे प्रयत्न लसीकरणं करण्यात आले नंतर भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहून त्यांच्या सुरेख सुंदर संगीताचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला व जो वायपट खर्च आहे तो टाळून २००० लोकांना जेवण्याची वेवस्ता करण्यात आली. जेवणा मध्ये जो पूर्वी लग्नात व इतर कार्यक्रमात जो लापशी हा प्रकार होता तो लोकांच्या जेवणाच्या ताटामध्ये बघण्यात आला व सर्व पाहुणे,राजकीया नेते,सामाजिक कार्यकर्ते,सर्व कार्यक्षत्रातील मान्यवरांनी खूप कौतुक केले.

प्रवीण (नाना) काळभोर, युवा नेते दत्तात्रेय आंबूरे,ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे,युवराज आंबूरे,संतोष सल्ले,अल्ताफ शेख, संदेश शिंदे,यांचे मोठे मोलाचे योगदान होते.

छत्रपती शिवाजी महाराज पूजन करण्यात आले त्या वेळी पंचयत समिती सदस्य सनी काळभोर,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सीताराम लांडगे,शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर,माजी सरपंच नंदकुमार काळभोर,माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर,मयुर कदम, आबा काळे,सामाजिक कार्यकर्ते चित्तरंजन गायकवाड,पांडा काळभोर,सतीश काळभोर,मुकुल काळभोर,पंकज गायकवाड,पंढरीनाथ नामुगडे, मनोज काळभोर व इतर मान्यवर उपस्थित होते.