पुणे

रोखठोक महाराष्ट्र न्युज प्रसिद्ध झालेल्या बातमीबाबत खुलासा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय सहन करणार नाही – नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे

पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
काळे पडळ येथील पाण्याच्या टाकीतून पुरवठा होणाऱ्या जलवाहिनीचे उदघाटन मोठ्या दिमाखात झाले, यावेळी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी सडेतोड भाषण करून विरोधकांचा समाचार घेतला होता, याबाबत रोखठोक महाराष्ट्र न्युज मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती या बातमीत नाना भानगिरे यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविकेचा समाचार घेतला असे प्रसिद्ध झाले,

प्रत्यक्षात माजी नगरसेविकेवर टीका करण्यात आली होती याबाबत माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी खुलासा केला आहे की या सभेत झालेल्या भाषणात विरोधक माजी नगरसेवकांवर टीका केली आहे, शिवसेनेच्या नगरसेविकेवर नाही तरी याबाबत संभ्रम निर्माण झाला असून आम्ही गेले पाच वर्षे पुणे महापालिकेच्या माध्यमातून खांद्याला खांदा लावून एकत्र प्रभागात काम करत आहे, काही लोक विनाकारण गैरसमज निर्माण करत आहेत,
प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून पालिकेचा मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे, अनेक रखडलेली विकासकामे मार्गी लावली आहेत, आगामी काळात विकासकामे घेऊन जनतेपुढे निवडणुकीस सामोरे जाणार आहोत आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते असुन पुणे महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज आहोत, असे माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी रोखठोक महाराष्ट्र न्युजशी बोलताना सांगितले.