पुणे

थेऊर येथे झालेल्या अनोळखी महीलेच्या खुनाचा लवकरात लवकर छडा लावा , भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रशासनाकडे मागणी

प्रतिनीधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर-हवेलीतालुक्यातील थेऊर येथे दगडाने ठेचून निर्घुणपणे खुन करण्यात आलेल्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यास भेट देऊन खुनाचा उलगडा त्वरित करावा अशी आग्रही मागणी केली आहे.

                 मंगळवार ( ५ जुलै) रोजी लोणी काळभोर पोलीस ठाणे अंकित थेऊर पोलीस चौकीच्या हद्दीत चिंतामणी हायस्कुल समोरच्या मैदाना शेजारील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेत अंदाजे २० ते २५ वर्षाच्या महिलेचा कोणीतरी अज्ञात इसमाने खुन केला आहे. पहाटे तिचा मृतदेह मिळुन आला आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी केलेल्या चौकशीत काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे लोणी काळभोर पोलीसांनी सदर महिलेचे छायाचित्रासह वर्णन प्रसिद्धीस दिले आहे.

                भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी कार्यकर्त्यांसह लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांची भेट घेतली. सदर प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर एक पिडीत महिला त्यांना भेटली. तिने आपणांस पती व सास-याने मारहाण केली असल्याचे सांगून तक्रार देवूनही पोलीस त्यांना अटक करत नसल्याचे सांगितले. यांवर वाघ यांनी याबाबत आपण पोलीस अधिक्षक डॉ. अमिताभ गुप्ता यांचेशी बोलणार असल्याची माहिती दिली.