पुणे

“मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोडून रुग्णवाहिकेला मदत करण्यास नाना भानगिरे धावले” – “पुण्यात माजी नगरसेवकांकडून शिंदे गटाचे समर्थन, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष”

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन न्युज)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यात आगमन झाले त्यानंतर त्यांचा ताफा विमानतळावरून हडपसर कडे रवाना झाला मात्र वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातून माजी नगरसेवक नाना भानगिरे थेट रस्त्यावर उतरले आणि रुग्णवाहिकेला वाट करून देत त्यांनी माणुसकी जपली, सत्कार समारंभात हा किस्सा मुख्यमंत्र्यांनीच सांगितल्याने चांगलीच चर्चा हडपसर मध्ये रंगली.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे प्रथमच पुण्यात आले होते त्यामुळे पंढरपूरला जाताना हडपसर गाडीतळ येथे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती नियोजित वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री पुणे विमानतळावर आले भानगिरे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले आणि मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातुन ते हडपसर च्या दिशेने रवाना झाले मात्र विमानतळ रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दीत एक रुग्णवाहिका अडकली होती आणि तिला बाहेर काढण्यासाठी एक महिला प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला प्रसंगावधान ओळखून भानगिरे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीतून तात्काळ उतरले पुढे स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी कुटुंबीय असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगत रुग्णवाहिकेला कोंडीतून सोडवण्यासाठी ते मागेच थांबलो पाच दहा मिनिटात कोंडी सुटली आणि रुग्णवाहिका रुग्णालयाकडे मार्गस्थ झाली एकीकडे मुख्यमंत्री हडपसर मध्ये पोहोचले मात्र भानगिरे सत्काराचा कार्यक्रम असल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली, अखेर मुख्यमंत्र्यांनी घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांचे कौतुकही केले एवढेच नाही तर आपण पुन्हा जाहीर कार्यक्रमासाठी नक्की हडपसर मध्ये येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले भानगिरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोडून रुग्णाला वाचण्यास प्राधान्य दिल्याने उपस्थित नागरिकांमध्ये भानगिरे यांचे कौतुक रंगले होते

मुख्यमंत्र्यांचे समर्थन केल्याने हडपसर मध्ये सेनेला खिंडार

माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे शिवसेनेकडून तीन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत, राज्यात शिवसेनेत बंडाळी झाली अन एकनाथ शिंदे यांनी सेनेचे आमदार फोडत भाजपच्या साथीने मुख्यमंत्री पद मिळविले, मुंबई, ठाणे, कल्याण व राज्यात अनेक जिल्ह्यात शिवसेनेतील पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत असताना पुण्यातील माजी नगरसेवक व शिवसेनेचे तगडे नेते असलेले नाना भानगिरे यांनी शक्तिप्रदर्शन करत एकनाथ शिंदे यांचे समर्थन केल्याने ते शिंदे गटात सामील झाले आणि सेनेला पुण्यात व हडपसर मध्ये खिंडार पडले आहे, भानगिरे यांच्याबरोबर पुण्यातील किती माजी नगरसेवक शिवसेना सोडतात हा चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेना नाना भानगिरे यांच्या या भूमिकेबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुण्यातील बंडाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.