पुणेहवेली

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळयात श्रध्देने आलेल्या भाविकांचे दागिने चोरणारी टोळी गुन्हेशाखा यनिट-६ ने केली जेरबंद

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

गुन्हयाचा तपास करित असताना युनिट ६ कडील अधिकारी व अंमलदार यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पुण्यातुन श्री क्षेत्र पंढरपुरकडे जात असताना पालखी मार्गावर तसेच विसावा ठिकाणी दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात त्यामुळे तेथे झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेवुन लोकाचे गळयातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरणारे व्यक्ती १) शंकर पवार २) महेंद्र अरगडे हे आळंदी पुणे रोडवर थांबलेले आहेत.

अशी बातमी मिळताच युनिट ६ चे पथकाने लगेच सापळा लावुन त्यांना खुप शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले व त्यांनी त्यांचे नाव १) शंकर शिवाजी पवार वय २३ वर्षे रान्पाथर्डी अहमदनगर २) महेंद्र सुरेश अरगडे वय २६ वर्षे रा- पाथर्डी अहमदनगर असे असल्याचे सांगीतले, तेव्हा त्यांचे कडे कसून तपास करता त्यांनी त्यांचे सहकारी ३) नितीन छगन काकडे वय २२ वर्षे, रा. पाथर्डी अहमदनगर असे मिळुन देहू, आळंदी व पुणे परिसरात संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पंढरपुरकडे जाणा-या पालखी मार्गावर दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या गर्दीत त्यांचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरलेले आहेत व ते चोरलेले दागिने इसम नामे ४) प्रशांत छगन टाक वय २६ वर्षे, रा-पाथर्डी अहमदनगर यांस विकलेले आहेत.

अशी कबुली दिल्याने युनिट ६ च्या पथकाने चोरीचे दागिने विकत घेणारा आरोपी नामे प्रशांत टाक यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन चोरीचे एकून २४ तोळे वजनाचे १२,२४,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करून त्यास गुन्हयात अटक करुन गुन्हयात भा.द.वि. कलम ४११ हे कलम वाढ केले आहे. तसेच अटक आरोपीचे १,३०,०००/- रुपये किंमतीचे महागडे २ मोबाईल जप्त केलेले आहेत, अटक आरोपीकडुन पुणे शहरात व पिंपरी चिंचवड परिसरात १६ चैन जबरी चोरीचे गुन्हे व २ चैन चोरीचे गुन्हे असे एकुण १८ गुन्हे उघडकिस करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगिरी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६ श्री. गणेश माने, पोलिस उप-निरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिद्र वाळके, विठठल खेडकर, रमेश मेमाने, कानिफनाथ कारखेले बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली आहे.