पुणे

“कर्मवीर’ जयंतीनिमित्त हडपसरच्या साधना संकुलात विविध कार्यक्रम”

हडपसर : गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगौत्री पोचवण्याचे कार्य करणारे आधुनिक ज्ञानभगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त साधना संकुलात भव्य मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम कर्मवीर पुतळ्यास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन दादा तुपे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव
प्राचार्य दत्तात्रय जाधव ,प्रिन्सिपल डाॅ. नानासाहेब गायकवाड,प्राचार्या सुजाता कालेकर,आजीव सभासद लालासाहेब खलाटे, डाॅ. शंतनू जगदाळे, अमर आबा तुपे ,
मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर,रोहिणी सुशीर ,झीनत सय्यद,बालवाडी विभागप्रमुख जयश्री यादव ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर माळवाडी परिसरात मिरवणूक काढण्यात आली. यात संकुलातील सर्व शाखेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. या मिरवणुकीत लेझीम पथक,झांज पथककातील विद्यार्थी सहभागी झाले व त्यांनी प्रात्यक्षिके सादर केली.
कर्मवीर जयंती कार्यक्रमाचे नियोजन साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,सर्व शाखांचे शाखाप्रमुख
उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते यांनी केले.