पुणे

लोणी-काळभोर चौकात वाहतूक जनजागृती अभियान,झिजस लव्हज फेलोशिप आणि आशेचे द्वार प्रतिष्ठानचा उपक्रम

हवेली प्रतिनिधी

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकार वाहने चालवण्यात मौज मानणाऱ्या वाहन चालकांमुळे अनेक लहान मोठे अपघात होतात.मागील महिन्यात लोणी-काळभोर स्टेशन येथे अपघातात दोन शालेय मुली मृत्युमुखी पडल्या त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या परंतु थोड्या कालावधीत सर्व पुन्हा पूर्ववत झाले.झिजस लव्हज फेलोशिप आणि आशेचे द्वार प्रतिष्ठान व लोणी-काळभोर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात आले.

यामध्ये संस्थेचे जोसेफ पवार, आशिष ताटे,जोएल थोरात, राहुल सावंत यांनी आपले सहकारी मुले यांच्या हातात वाहतूक नियमांसंबंधी फलक घेऊन स्टेशन चौकात तसेच एम आय टी चौकात उभे राहून वाहन चालकांना नियम पाळण्यासाठी आवाहन केले.तसेच वाहतूक शाखेचे हवालदार रामदास गिरमे, पोलीस नाईक उमेश ढाकणे, पोलीस अंमलदार चक्रधर शिरगिरे,वाहतूक पोलीस, विजय कांबळे, नाहीद शेख यांनीही या अभियानात सहभाग घेतला.