पुणेहवेली

दोन वर्षाकरीता तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारास अटक

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

अभिजीत अभिमन्यु आहेरकर वय २१ वर्षे रा.कन्या शाळेचे मार्ग, लोणी काळभोर ता.हवेली जि. पुणे यांच्या वर लोणी काळभोर पोलीस ठाणे मध्ये शरीराविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो लोणी काळभोर पोलीस ठाणे मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला दिनांक २५/०८/२०२१ रोजी पासून २ वर्षाकरीता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार केलेले असताना, त्याने मा. पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ ५. पुणे शहर यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता पुणे शहरात प्रवेश करून त्यांचे आदेशाचा भंग करीत लोणी काळभोर पोलीस ठाणे हददीत प्रवेश केला, महालक्ष्मी हॉटेल, कुंजीर लॉन्स शेजारी, कुंजीरवाडी ता हवेली जि. पुणे येथे आला आहे अशी बातमी पोलीस अंमलदार राजेश दराडे यांना मिळाली त्यांनी ती बातमी पोलीस उप निरीक्षक अमित गोरे यांना कळविले व त्यानी वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना कळविले असता त्यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व अंमलदार यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या पथकाने तडीपार सराईत गुन्हेगारास सापळा रचुन महालक्ष्मी हॉटेल, कुंजीरवाडी लॉन्स शेजारी, कुंजीरवाडी ता हवेली जि. पुणे येतून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले व त्याच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, मा. सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, यांचे सोबत राजेश दराडे, दिपक सोनवणे, नितेश पुंडे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे