पुणे

“सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जनसामान्यांचे हित जपण्याचे काम लोककल्याण प्रतिष्ठानने केले – तूकाईदर्शन येथे लोककल्याण दिनदर्शिका -२०२३ चे प्रकाशन”

सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जनसामान्यांचे हित जपण्याचे काम लोककल्याण प्रतिष्ठानने आपल्या वाटचालीत केले असल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी तूकाईदर्शन येथे बोलताना व्यक्त केले.लोककल्याण दिनदर्शिका -२०२३ चे प्रकाशन तूकाई दर्शन येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात होले यांच्या शुभहस्ते झाले याप्रसंगी विविध मान्यवर आणि संस्थेचे कार्यकारिणी सदस्य उपस्थितीत होते.यावेळी राजाभाऊ होले हे बोलत होते. ते पुढे म्हणाले गेली वीस वर्षे झाले सातत्याने दरवर्षी लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतिने ” लोककल्याण दिनदर्शिका ” समाजात मोफत वितरित करत असते.
यावेळी लोककल्याण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी,कार्यकारिणी सदस्य तुकाराम घोडके,जनार्दन चव्हाण,चंद्रकांत वाघमारे,पांडुरंग शेंडे,मोरेश्वर कुलकर्णी,प्रविण होले,वैशाली होले,पद्मिनी माने,मंगल लोणकर,लता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.तुकाई दर्शन येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामींची आरती ,वंदन करून दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोककल्याण प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.