पुणेबारामती

बारामती येथील उंडवडीतील शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी दोन वायरमनवर गून्हा दाखल

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

बारामती, (पुणे) : वीजेच्या खांबावर शेतकऱ्याला चढायला लावून त्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन वायरमनविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप भापकर व सचिन माने अशी गुन्हा दाखल झालेल्या वायरमनची नावे आहेत. विजय यांचे बंधू पोपट मुरलीधर गवळी यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय मुरलीधर गवळी ( वय ५४, रा. उंडवडी सुपे, ता. बारामती) या शेतकऱ्याचा मंगळवारी (ता. ०४) अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर ग्रामस्थ व कुटुंबियांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱयांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.

दरम्यान, याप्रकरणी भापकर व माने या दोघा वायरमनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत तालुका पोलिस ठाण्यात विजय यांनी यापूर्वी वीजेचे खांब उभे करण्याचे काम केलेले असल्याने खांबावर चढून इलेक्ट्रीक कामे करणे त्यांना शक्य होत असे. या भागात वीजेची काही समस्या निर्माण झाल्यास महावितरणचे वायरमन त्यांना कामासाठी बोलावत होते.