पुणे

महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी युवकांनी कार्य करावे. दिलीप आबा तुपे

हडपसर , 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.आज महाराष्ट्र राज्य देशात प्रगतीपथावर आहे. कृषी,शिक्षण,आरोग्य , पर्यटन,खेळ,कला,विज्ञान,औद्योगिक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे.महाराष्ट्र राज्य अधिक प्रगतीपथावर जावे यासाठी युवकांनी कार्य करावे ,अभ्यासाबरोबर विविध क्षेत्रात ,स्पर्धा परीक्षा,खेळ व सांस्कृतिक बाबतीत यश मिळवावे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य दिलीप आबा तुपे यांनी केले.साधना विद्यालयात आयोजित महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत,ध्वजगीत व महाराष्ट्र राज्य गीत सादर करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य अरविंद तुपे,संस्थेचे आजीव सभासद व साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुशीर,मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर,बालवाडी विभागप्रमुख जयश्री यादव,उपमुख्याध्यापिका योजना निकम,उपप्राचार्य डाॅ. अमिरुद्दीन सिद्दीकी, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते , कुमार बनसोडे,माधुरी राऊत , आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा,खेळाडूंचा
सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.तर ध्वजसंचलन एन. सी. सी. ऑफिसर लालासाहेब खलाटे व R.S.P जिल्हा समादेशक रमेश महाडीक यांनी केले.कार्यक्रमाचे निवेदन अनिल वाव्हळ व प्रतापराव गायकवाड यांनी केले.महाराष्ट्र राज्यगीत कारभारी देवकर,संगिता शिंगाणा व भानुदास पाटोळे यांनी सादर केले.